Wednesday, February 28, 2024

आपली मराठी भाषा

 दिनांक २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने 'आपली मराठी भाषा' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. प्रा. डॉ. सुजाता शेणई व प्रा. संतोष शेणई यांनी मराठी भाषेतील विविध पैलू, शब्दांचे अर्थ व महत्व उलगडून दाखविले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार यांनी अध्यक्षीय भाषणात मराठी भाषा आणि शब्द सामर्थ्य यावर आपले विचार मांडले. याप्रसंगी प्रा. विशाखा वाघ, प्रा. मीनल काबरा, प्रा. स्वप्नील कांबळे, प्रा. गुरमीत कौर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे समन्वय व सूत्रसंचालन प्रा. डॉ. आश्विनी कुलकर्णी यांनी केले. प्राचार्यांनी या कार्यक्रमा द्वारे आणखी विधायक स्वरूपात भाषा समृद्धीचे व संवर्धनाचे उपाययोजन करणे गरजेचे आहे हे अधोरेखित करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. 

प्रा. स्वप्नील कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.












No comments:

Post a Comment

This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.

Note: Only a member of this blog may post a comment.