Thursday, February 24, 2022

पुरुषोत्तम करंडक 2021

 पुरुषोत्तम करंडक 2021


*पारितोषिक समारंभ *

• अनुष्का गोखले. { मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय पुणे }

एकांकिका :- *ठसका *

पारितोषिक :- * सुरेश चौधरी - कै. अनंत कृष्णाजी पारितोषिक*

• मुकुल ढेकळे :- { मराठवाडा मित्रमंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे }

एकांकिका :- *घुंगरू *

पारितोषिक :- *रमा पुरुषोत्तम - कै. अनंत कृष्णाजी पारितोषिक* 

First Prize for Street Play

NSS team has participated and won first prize in the inter College level street play competition on 23rd February, 2022 organised by AIMS, Pune.  The theme of the street play was "Say No to Drugs".


Following NSS volunteers had participated in this street play competition:      
Akash khajekar
Gaurav pavale
Sayli kadam
Priyanka potdar
Gauri kemble
Rushi kolekar
Siddharth salwe
Lavanya khandekar
Rutuja nerkar
Sanika gotpagar
Chetashree chaoudhary
Vaishanvi waghmare
Saurav dhamale
Omkar kumbhar
and grabbed first prize.

Marketing Management Book by Prof. Pravin Kad


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ School of Open Learning (Distance Education Program) अंतर्गत S.Y. B. Com च्या अभ्यासक्रमातील विपणन व्यवस्थापन (Marketing Management) या विषयावरील एकुण 08 प्रकरणाचे 238 पानांचे पुस्तक संदर्भ साहित्य म्हणून आज प्रकाशित झाले. या पुस्तकातील पहिले चार प्रकरण लिहिण्याची संधी मला मिळाली. सहलेखक प्रा. सुरेश देवढे , डॉ.पूनम साबळे-शिंदे, प्रा. शेख शोयब यांचे अनमोल सहकार्य प्राप्त झाले.डॉ. संजय कप्तान सरांनी ही बहुमूल्य संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार! आपल्या सर्वांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सदिच्छा यामुळे हे कार्य होऊ शकले, याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.🙏😊 

Value Added Course - Department of Computer Science

XML using EDITIX








Escalate with Excel


Fundamentals of Arduino and Programming









My River My Valentine

आज रविवार दि. 13 फेब्रुवारी 2022 रोजी आपल्या मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना आणि Worship Earth Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने "My River, My Valentine" या उपक्रमाअंतर्गत मुळा मुठा नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या 80 स्वयंसेवकांनी उस्फूर्तपणे भाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डॉ. कल्पना वैद्य, रासेयो विद्यार्थी स्वयंसेवक मनीष भोसले, अक्षता बकरे यांनी सहाय्य केले. 

98 students of NSS and college cleaned the river near Bhide bridge in association with Nehru Yuva Kendra and We Punekar.



Saturday, February 12, 2022

Operating System Installation


Department of Computer science organised a workshop on *"Operating System Installation"* by Vikas Adiwal, Alumni (2017 pass out batch) and back-end developer, QiO, Pune; on Saturday 5th February, 2022 at 11.30AM. 210 students and teachers attended the session. 

Registration link to workshop https://forms.gle/BuJGLih6X5v9HzqK6


Webinar on Data Science & Machine Learning

Department of Computer Science organised Webinar on Data Science & Machine Learning by speaker Ms. Neeraj Bhadoria, Corporate Trainer and coordinated by Sandeep Akhate, Alumni (2021 pass out batch).

Details are as follows:

📌Topic: Trending Technologies- Data Science & Machine Learning

📌Duration: 45mins - 60mins

📌Mode: Online Google meet (or as prefered online meeting platform)

📌Date : 11 Feb 2022 Time : 3 pm

Intent / Take away: Understand specifics about Data Science & Machine Learning, Pre- requisite to learn Data Science & Machine Learning, Career opportunities and current Market trends. Google Form for pre registration of the Webinar (Compulsory) https://forms.gle/6f3sN67VttzYHKCW6

Design ,Thinking , Innovation and Research under ROP

Department of Computer Science under "Research Orientation Program" (ROP)  organised Guest session on "Design ,Thinking , Innovation and Research" by Prof. Shashikant Shinde on Saturday ,12 February 2022 at 11.00 am through *Google meet*. 141 students and teachers attended the session.

https://forms.gle/qD52LhshE8QPMAr16

Extension Activities : Compost & Best out of waste

The Department of Business Administration has organized 2 Extension Activities for TYBBA and TYBBA-1B students. 


1. Compost Activity : Students have collected the nirmalya (i.e. used flowers) from the religious places/home. They have brought them into the college campus and kept it in a composting box. Total 47 students of TYBBA-1B and 94 students of TYBBA have performed the activity.






2. Best Out of Waste Activity: The students who live out of Pune for them this activity is conducted by the department. Total 19 students of TYBBA-1B and 27 students of TYBBA have presented their project in a virtual meet. 

E-Certificate provided to all the participants.

Reel Making Contest

The Department of Computer Science conducted a Reel Making Contest on the occasion “Republic Day” under the initiative of the Government of India “Azadi Ka Amrut Mahotsav”'.

Reel Making Competition is an initiative to portray your creativity in any form to the wider public through us. Theme for the contest was Patriotism. Patriotism is a sentiment that could crush the  strongest boulders of malice, a sentiment as gentle as a wave in the ocean that brings along a whoosh of affinity to commemorate the diversity of culture. It is not a feeling that comes for a day to fade away. It is something that stays there, right there in the most special corner of your heart and overwhelms you, time and again, with an inexplicable love for your motherland.

The contest was conducted on 25th January 2022 and received overwhelming response where students created reels of singing,dancing, photographs etc; based on theme. The winners for this contest are

Tilaksingh Gokulsingh Tawar - FYBSc (CS)

Siddhi Anil Deshmukh - TYBSc (CS)

Sai Umesh Thakar - SYBBA (CA)

Omkar Balasaheb Borude TYBSc (CS)

राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर 2021-2022

 *मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर 2021-2022 यशस्वीपणे संपन्न...* 


मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे 7 दिवसीय निवासी विशेष श्रमसंस्कार  शिबिर मौजे चिंचवड, पोस्ट: बेलावडे, तालुका: मुळशी, जिल्हा : पुणे येथे दि. 30 जानेवारी 2022 ते दि. 05 फेब्रुवारी 2022 या कालावधीत यशस्वीपणे पार पडले.

या  श्रमसंस्कार शिबिरामध्ये महाविद्यालयातील 22 विद्यार्थिनी आणि 33 विद्यार्थी असे एकूण 55 स्वयंसेवक सहभागी झाले होते.

या शिबिराचे उद्घाटन दि. 31 जानेवारी 2022 रोजी सकाळी  11:00 वा. चिंचवड  येथे लोकसेवा परिवाराचे संस्थापक मा. श्री माणिककाका शेडगे व सौ शुभांगीताई शेडगे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. याप्रसंगी चिंचवड गावच्या सरपंच श्रीमती शोभाताई ज्ञानेश्वर कंधारे आणि चिंचवड ग्रामपंचायतीचे सदस्य आणि प्रतिष्ठित मान्यवर व नागरिक देखील उपस्थित होते. तसेच याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. सारंग एडके, डॉ. नासिर शेख, डॉ. मुरलीधर गायकवाड, डॉ. संदीप अनपट, इत्यादी उपस्थित होते. या उद्घाटनपर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण कड यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुशील गंगणे यांनी केले. प्रा. अमोल चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले.

शिबिरादरम्यान चिंचवड गावात ग्रामविकासाचे विविध उपक्रम हाती घेण्यात आले. यामध्ये श्रमदान, ग्राम सर्वेक्षण, माझा गाव कोरोनामुक्त गाव अभियान, जलसंवर्धन, पर्यावरण जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्ती, लिंगभाव संवेदनशीलता जाणीवजागृती, सामाजिक प्रबोधन, पथनाट्य, बौद्धिक चर्चासत्रे, गटचर्चा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. तसेच स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त माहितीपट व चित्रपटाचे प्रदर्शन देखील करण्यात आले.

शिबिरादरम्यान दररोज सकाळी 8:00 ते दुपारी 12:30  या वेळेत श्रमदान करण्यात आले. यामध्ये गावातील परिसर स्वच्छ करणे, गवत काढणे, गाळ काढणे, शाळा व मंदिरांसाठी मैदान तयार करणे, रस्त्यांची दुरुस्ती व सुशोभीकरण करणे इत्यादी कामे करण्यात आली.

शिबिरादरम्यान दररोज दुपारी 3 ते 5 या वेळेत बौद्धिक सत्रात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 'उद्याचा भारत घडविताना' , 'स्वतःला ओळखताना', 'जीवन सुंदर आहे' , 'निरोगी जीवनाची गुरुकिल्ली' 'श्रद्धा व अंधश्रद्धा: सप्रयोग व्याख्यान' इत्यादी विषयांवर बौद्धिक सत्र आयोजित करण्यात आले. याप्रसंगी अनुक्रमे प्रा. स्वामीराज भिसे, प्रा. सुशील सूर्यवंशी, श्री मनोज वाबळे, श्री जगन्नाथ शिंदे आणि श्री नवनाथ लोंढे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.  

या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, संघ बांधणी, नेतृत्व गुण, भाषिक कौशल्य, समाजाप्रती संवेदनशीलता, एकता व एकात्मता इत्यादींचे धडे प्रत्यक्ष कृतीतून शिकायला मिळाले.

रासेयो स्वयंसेवकांनी ग्राम सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावातील कुटुंबांची सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक परिस्थिती जाणून घेतली आणि त्यासंबंधीचा अहवाल ग्रामपंचायत चिंचवड यांना सुपूर्द करण्यात आला. यामध्ये एकूण 51 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले.

4 फेब्रुवारी या जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून 'आपलं घर' डोणजे, पुणे या संस्थेच्या सौजन्याने आणि श्रीमती कौशल्या लाड ग्रामीण रुग्णालय गोळेवाडी डोनजे, पुणे यांच्या सहकार्याने गावातील महिलांसाठी स्तनांच्या कर्करोगाविषयी कार्यशाळा व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड गावातील एकूण 38 महिलांनी या शिबीराचा लाभ घेतला.

दि. 05 फेब्रुवारी 2022  रोजी सकाळी 11 वा. या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी मा. श्री किरण मांडे (व्यवस्थापक: आपलं घर पुणे) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संदीप अनपट हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल कांबळे यांनी केले.

शिबिर यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी प्रा. सुशील गंगणे, डॉ. संदीप अनपट, प्रा. अमोल चौधरी यांनी मोलाची भूमिका बजावली व अथक परिश्रम घेतले.

शिबिरादरम्यान प्रा. स्नेहल बोरकर, डॉ. कल्पना वैद्य, प्रा, कोमल गलांडे, प्रा. योगेश करंडे, डॉ. शिल्पा काबरा, डॉ. पूनम शिंदे, डॉ. अश्विनी पारखी, डॉ. स्वप्ना कोल्हटकर, प्रा. स्वप्निल कांबळे, प्रा. प्रमोद सपकाळ, प्रा. गीता पाटील, प्रा. नीता पाटील, प्रा. मंजिरी देशमुख प्रा. स्वाती शेलार यांचे विशेष सहकार्य लाभले. हर्षला वाडकर मॅडम, नितीन सुरते यांनी शिबिराला सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज साधले.

या एक आठवड्याच्या निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिरातून अंदाजे रक्कम रु. 1,00,000/- ची लोकहिताची कामे करण्यात आली, असे चिंचवड ग्रामपंचायतीद्वारे प्रमाणित करण्यात येऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

शिबिर यशस्वीपणे संपन्न होण्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार सर यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सहभागी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार!🙏

Com -Fest 2021-22

The Department of Commerce had organized the Com -Fest 2021-22 from 24.01.2022 to  31.01.2022.

The chief guest for the online inaugural ceremony of Com-Fest 2021-22 was Dr. Parag Kalkar Dean, Commerce and Management, SPPU. He appreciated that even in pandemic the Department is organising curricular and co curricular activities for students to give them hands on experience and innovative ideas of the corporate business world. He also pointed to the students that participation is more important than winning.
Under Com-Fest 2021-22 competitions like Biz Quiz, Business Plan, Mad Ads, Presentation,Report Writing etc.were conducted.