Thursday, April 14, 2022

Visit by Eklavya Foundation and Savitribai Jotirao Social Work College

 *एकलव्य फाउंडेशन व सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ यांची आपल्या मराठवाडा मित्र मंडळ संस्था व वाणिज्य महाविद्यालयाला सदिच्छा भेट* 


आदिवासी समाजाच्या विकासासाठी व पुनरुत्थानासाठी कार्यरत असलेल्या एकलव्य फाउंडेशन व सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ या संस्थांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पुणे येथील शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने दि. 1 एप्रिल 2022 रोजी आपल्या मराठवाडा मित्र मंडळ संस्था व वाणिज्य महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. यामध्ये एकूण 12 मुली, 18 मुले आणि 3 शिक्षकांचा सामावेश होता. 

सदर भेटीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मराठवाडा मित्र मंडळ संस्था आणि संस्थेअंतर्गत कार्यरत असलेली विविध महाविद्यालय तसेच त्या अंतर्गत चालविण्यात येत असलेली विविध कोर्सेस यासंबंधीची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर संस्थेच्या परिसरातील वाणिज्य महाविद्यालय, शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, वास्तुविशारद महाविद्यालय, विद्यार्थी मंच इत्यादींच्या भेटी घडवून आणण्यात आल्या. तसेच वाणिज्य महाविद्यालयात वर्षभरात राबविण्यात आलेले विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम, विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश व कामगिरी, राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत राबवलेले उपक्रम, संस्थेची शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील वाटचाल इत्यादी संबंधी चित्रफित प्रदर्शित करण्यात आली.
सदर शैक्षणिक सहलीचा एक भाग म्हणून संस्था व महाविद्यालयाच्या भेटीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की, "समाजकार्य महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असलेली आदिवासी समाजातील ही आमची पहिलीच पिढी आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, त्यामुळे येथील शैक्षणिक संस्था व संस्कृतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करण्याचा आमचा मानस आहे.." 

संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय भाऊसाहेब जाधव सर तसेच प्रा. तेज निवळीकर सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. विशाल डोळे यांनी संस्थेचे व महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन दुपारी 5:00 ते सायंकाळी 7:00 या वेळेत करण्यात आले होते. 

सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण कड यांनी केले. डॉ. संदीप अनपट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच विद्यार्थ्यांना संस्था व महाविद्यालयांची ओळख करून दिली. प्रा. सुशील गंगणे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. प्रा. अमोल चौधरी, प्रा. स्वप्निल कांबळे व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यास मोलाची मदत केली.

Two Day Workshop on ‘Preparation of SET/ NET Paper 1’



Dr. Megha Uplane, (Professor in Education, Department of Education & Extension) Chief Guest for the two day workshop on ‘Preparation of SET/ NET Paper 1’; guided all offline and online aspirants on Research Aptitude. In her discussion during the technical discussion, she made all aware of the research goals and types.

The two day workshop was graced by seven other esteemed guest speakers who guided all with their knowledge and shared their experiences. Dr. B N Waphare, (Professor, Department of Mathematics, Savitribai Phule Pune University) guided the aspirants on various Mathematical theorems, Mathematics reasoning and its intricacies. The third session on Logical Reasoning by CA Pranav Chandak (Founder of Pranav Chandak Academy, Pune) was all about syllogism and venn diagrams details. Dr. D. Tapkeer (S.N.D.T. College of Education, IASE, Maharshi Karve Vidya Vihar) enlightened on Educational Philosophy at a Glance. Dr Chitraranjan R Das, (Professor of History at Competitive Examination Center, Savitribai Phule Pune University) guided all on Teaching Aptitude and discussed a number of concepts through objective questions. Mr. Shashank Surve, (Trainer in Mathematical Aptitude & Reasoning) interacted with all for Data Interpretation through Pi Charts, Table Charts etc for interpreting graphical information. Prof. Pravin Kad (Asst. Prof. MMCC and CEC trainer), discussed the details of People Development & Environment and discussed general questions of the paper. Dr. Sandip Anpat (Head of Computer Science, CEC Coordinator & ISRO-IIRS Coordinator), guided all on Information & Communication Technology and the importance of general awareness in the field. Online aspirants interacted with guest speakers through Google Meet.

Sunday, March 27, 2022

5th Prize in Street Play

 


अप्पासाहेब जेधे महाविद्यालय, पुणे येथे आज दि. 25 मार्च 2022 रोजी  झालेल्या पथनाट्य प्रशिक्षण व सादरीकरण कार्यशाळेत आपल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या  विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करुन *पाचवा क्रमांक पटकावला.* 

Inauguration of Student Forum

 *राष्ट्रीय सेवा योजना* व *विद्यार्थी विकास मंडळ* अंतर्गत

📯 *विद्यार्थी मंच -STUDENTS FORUM* 📯
उद्घाटन सोहळा आज *बुधवार दि. 16 मार्च, 2022 दुपारी 12.30 वा.* संपन्न झाला. 
विद्यार्थी मंचचे *उद्घाटन प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार यांच्या हस्ते* झाले. या प्रसंगी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. 
कार्यक्रमात प्रा. सारंग एडके, डॉ. संदीप अनपट, प्रा. सुशील गंगणे, डॉ. कोल्हटकर व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल चौधरी व आभार प्रदर्शन प्रा. प्रविण कड यांनी केले.
सदर विद्यार्थी मंच उभारणीसाठी प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार, डॉ.संदीप अनपट, प्रा. सुशील गंगणे, प्रा. प्रविण कड यांचे विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना वेळोवेळी मिळाले. 



Media & Cinema Lecture Series


Department of Journalism and Mass Communication has organized a lecture series on Media and Cinema by Ms. Nilambari Joshi (Media Professional and Writer )

Prof. Santosh Shenai introduced students about the practicality of the subject in contemporary time. It is a three day lecture series (14-16th March).