*एकलव्य फाउंडेशन व सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ यांची आपल्या मराठवाडा मित्र मंडळ संस्था व वाणिज्य महाविद्यालयाला सदिच्छा भेट*
सदर भेटीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मराठवाडा मित्र मंडळ संस्था आणि संस्थेअंतर्गत कार्यरत असलेली विविध महाविद्यालय तसेच त्या अंतर्गत चालविण्यात येत असलेली विविध कोर्सेस यासंबंधीची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर संस्थेच्या परिसरातील वाणिज्य महाविद्यालय, शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, वास्तुविशारद महाविद्यालय, विद्यार्थी मंच इत्यादींच्या भेटी घडवून आणण्यात आल्या. तसेच वाणिज्य महाविद्यालयात वर्षभरात राबविण्यात आलेले विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम, विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश व कामगिरी, राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत राबवलेले उपक्रम, संस्थेची शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील वाटचाल इत्यादी संबंधी चित्रफित प्रदर्शित करण्यात आली.
सदर शैक्षणिक सहलीचा एक भाग म्हणून संस्था व महाविद्यालयाच्या भेटीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की, "समाजकार्य महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असलेली आदिवासी समाजातील ही आमची पहिलीच पिढी आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, त्यामुळे येथील शैक्षणिक संस्था व संस्कृतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करण्याचा आमचा मानस आहे.."
संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय भाऊसाहेब जाधव सर तसेच प्रा. तेज निवळीकर सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. विशाल डोळे यांनी संस्थेचे व महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन दुपारी 5:00 ते सायंकाळी 7:00 या वेळेत करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण कड यांनी केले. डॉ. संदीप अनपट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच विद्यार्थ्यांना संस्था व महाविद्यालयांची ओळख करून दिली. प्रा. सुशील गंगणे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. प्रा. अमोल चौधरी, प्रा. स्वप्निल कांबळे व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यास मोलाची मदत केली.
No comments:
Post a Comment
This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.
Note: Only a member of this blog may post a comment.