मृत्युंजय
-शिवाजी सावंत.
जगातील सर्वात मोठं महाकाव्य म्हणजे महाभारत.आणि माझा सगळ्यात आवडीचा विषय ही. महाभारतात इतक्या व्यक्तिरेखा आहेत की मोजता मोजता कदाचित भोवळ येईल. यातीलच एक वक्तिरेखा म्हणजे कुंतीपुत्र, अंगराज, राधेय म्हणजेच कर्ण.
शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय या कादंबरीने कर्ण या नावाला एक वेगळीच ओळख मिळवून दिली. खरतर या कादंबरीने माझी वाचण्याची आवड अधिकच वाढवली. कर्णनाचे चांगले आणि वाईट गुण यातून मांडले गेले आहेत. लहानपापासूनच कर्ण ला मिळालेली वागणूक आणि जगाला आपली क्षमता दाखवून देण्यासाठी कर्णानी केलेले प्रयत्न यात आपल्याला पाहायला मिळतात. कादंबरीचा उत्कृष्ठ भाग म्हणजे कर्णाच्या लहानपणी बद्दल केलेलं वर्णन सावंत यांनी प्रसंग वर्णन इतक्या उत्तम पद्धिते केले आहे की वाचताना आपण एका वेगळ्याच दुनियेत जातो. हळूहळू आपणही कर्ण होऊन जातो.आपणही कर्ण होऊन जगात आहोत असा वाटायला लागतं. बुद्धी असूनही एका चुकीच्या निर्णयाचा काय परिणाम असू शकतो याचं उदाहरण म्हणजे राधेय च जीवन. वाचताना पुढे काय होईल याची उत्सुकता इतकी वाढते की पुस्तकं ठेवू वाटत नाहीं. महाभारतातील आपल्याला माहिती नसलेल्या अनेक नातेसंबंधांचा उलगडा या कादंबरी मधून होतो. महाभारत आणि कर्ण या बाबतीत विस्तारामध्ये जर जाणुन घ्यायचे असेल तर मृत्युंजय आवर्जून वाचावी.
(रसिका पाटील.)
TYBBA-CA