Thursday, October 20, 2022

PEHEL 2022

 *PEHEL 2022 या उपक्रमात आपल्या MMCC NSS च्या स्वयंसेवकांचा सक्रियपणे सहभाग:* 


आज रविवार दि. 16 ऑक्टोबर 2022 रोजी आपल्या मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी PEHEL 2022 (Plastic and E-waste Handling for Eco- friendly Lifestyle) या इ कचरा आणि प्लास्टिक कचरा संकलन व व्यवस्थापन आणि जाणीवजागृती उपक्रमात सक्रियपणे सहभाग घेतला. 
सदर उपक्रम पुणे महानगरपालिका, आदर पूनावाला स्वच्छ शहर उपक्रम, जनवानी संस्था, कमिन्स इंडिया फाउंडेशन इत्यादी संस्थांच्या सहयोगाने सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत राबविण्यात आला होता.

सदर उपक्रमाचे उद्घाटन चित्तरंजन वाटिका,शिवाजीनगर येथे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. विक्रम कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पुणे मनपाचे नवनियुक्त स्वच्छतादूत म्हणून सुप्रसिद्ध कवी, गीतकार आणि लेखक डॉ. सलील कुलकर्णी तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या टेनिसपटू ऋतुजा भोसले उपस्थित होते.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी याप्रसंगी पर्यावरण संवर्धनाविषयी पथनाट्य सादर करून ई कचरा आणि प्लास्टिक कचरा संकलन आणि व्यवस्थापनाबाबत जाणीव जागृती केली. महाविद्यालयातील 48 विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमात सक्रियपणे सहभाग नोंदविला.
पुणे मनपा आयुक्त श्री विक्रम कुमार आणि डॉ. सलील कुलकर्णी यांनी याबाबत विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच तरुणाईच्या या पर्यावरण संवर्धनाच्या विधायक कार्यातील सहभागाबाबत आनंद व्यक्त केला.
महाविद्यालय स्तरावर प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार, प्रा. एस. एम. एडके यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम यशस्वीपणे पार पडला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण कड, प्रा. सुशील गंगणे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.





Mahishasur Mardini Stotra, posted on 9th October 2022.


Excellent performance by Devesh Gumaste on instrument and Vismita Moolya as Bharatnatyam dancer for Mahishasur Mardini Stotra, posted on 9th October 2022.


Tabla -Devesh Rahul Gumaste

Singing- Sai Umesh Thakar

Bharatanatyam - Vismita Jagannath Moolya 

Venue - Laxmi narayan mandir , Raviwar peth

Event - posted on the event of kojagiri purnima

Date - 9 October 2022

Description- 
Three different skills brought together, to make a small video praying Goddess Devi.

स्वच्छ अमृत महोत्सव

 

*एम एम सी सी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत उद्या दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम* :


उद्या दि. 2 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त "स्वच्छ अमृत महोत्सव" राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये इंडियन स्वच्छता लीग, पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त कार्यालय तसेच MMCC NSS यांचा सहभाग असणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता एस एम जोशी ब्रीज जवळ होणार आहे. 
तसेच सकाळी 9:30 वाजता पुणे रेल्वे स्टेशन, महात्मा गांधी स्मारकाजवळ महाविद्यालयातील विद्यार्थी पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत पथनाट्य सादर करणार आहेत.

*राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त MMCC NSS चा "स्वच्छ अमृत महोत्सवात" उस्फूर्त सहभाग:* 

आज दि. 2 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त "स्वच्छ अमृत महोत्सव" मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये इंडियन स्वच्छता लीग, पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त कार्यालय, नेहरू युवा केंद्र तसेच MMCC NSS यांनी सक्रियपणे सहभाग घेतला. 
या उपक्रमाचे उद्घाटन आज सकाळी 7:30 वाजता एस एम जोशी ब्रीज जवळ करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी नदीपात्रात प्लास्टिक मुक्त अभियान राबविले तसेच कचरा संकलन व व्यवस्थापनात पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना मदत केली. 


तसेच सकाळी 9:30 वाजता पुणे रेल्वे स्टेशन, महात्मा गांधी स्मारकाजवळ विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास अभिवादन करून स्वच्छतेची प्रतिज्ञा केली. तसेच विद्यार्थ्यांनी लाल बहादूर शास्त्री यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाविषयी पथनाट्याच्या माध्यमातून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी पुणे मनपाचे आयुक्त मा. विक्रम कुमार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. महाविद्यालयातील 46 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाली होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम पार पडला.प्रा. प्रवीण कड आणि डॉ. कल्पना वैद्य यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Life of Bapuji: A Paragon

 


On 30th September 2022, the exhibition on *Life of Bapuji: A Paragon* received an overwhelming response from FY,SY BBA(CA)& B.Sc(CS) students.

The event was graced by Hon'ble Executive President B.G.Jadhav sir for inauguration of the exhibition. His August presence and guidance on imbibing the preachings of Gandhiji as Indian contribution to the world, motivated our students and teachers for a better tomorrow.
Prof.Swapnil Kamble gave his valuable time to judge the best exhibits. His critical inputs helped the students in their creative thinking.
*Winners*
*Best physical Model*:-  Atharva Mahamuni, SYBBACA
*Best Calendar*:-  Sidhhant Gawade, FYBBACA
*Best PPT/Website/Animation* Kartik Ghatage,FYBSc(CS)
*Best GandhiKosh* Sohan Kendre FYBSc(CS)
*Consolation Prize*
*Animation* by  AbhishekJaiswal   FYB.SC(CS)
*Website* by Atharva    Naik,SYBBACA

Abhinav Singh in Alfaz Kavya Pratiyogita 2022-23


A student of *SYBBA Abhinav Singh secured *1st position* in the *Alfaz Kavya Pratiyogita 22-23*  *Intercollegiate* *Competition of Self Composed Hindi Poetry* organised by MIT, Pune. He presented his poem during competition.

As a prize he received cash prize of *Rs 2000/-, Trophy and the certificate*.