Thursday, August 11, 2022

Boom Mic Gifted by MA(JMC) students

 MAJMC Senior Students Gifted A Boom Mic to Department. It is one of the most important equipment for Broadcast News Production on 15th June 2022


.

Tuesday, June 7, 2022

Celebration of Shivswarajya on 6th June 2022


शिवस्वराज्य दिन महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा:* मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना तसेच विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने आज दिनांक 6 जून 2022  हा शिवराज्याभिषेक दिन/शिवस्वराज्य दिन म्हणून महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

 

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शिववंदना सादर केली. डॉ. संदीप अनपट, डॉ. अश्विनी कुलकर्णी तसेच विद्यार्थ्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण कड यांनी केले तर आभार प्रा. सुशील गंगणे  यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. 



Blood Donation Camp


एमएमसीसी महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न:* आज दिनांक 3 जून 2022 रोजी मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ तसेच घोलप ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण 50 जणांनी रक्तदान केले. सदर शिबिर सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत आयोजित करण्यात आले होते. शहरातील रक्तपुरवठ्याची कमतरता लक्षात घेता सदर शिबिराचे तातडीने आयोजन करण्यात आले होते. याबद्दल ब्लड बँकेकडून महाविद्यालयाला प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार तसेच घोलप ब्लड बँकेच्या वतीने श्री रोहिदास घोलप , प्रा. एस. एम. एडके, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण कड आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यात प्रा. सुशील गंगणे, डॉ. संदीप अनपट, प्रा. अमोल चौधरी, प्रा. प्रमोद सपकाळ, डॉ. शिल्पा काबरा, डॉ. अश्विनी पारखी, डॉ. कल्पना वैद्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Rasvanti Karandak


 MMCC Art circle team participated in Rasvanti Karandak 2022..... waiting for result 




Article on Social Issue by MAJMC Student

 

MAJMC First Year च्या 
सिद्धांत शेळके या विद्यार्थ्याने 
ऊसतोड प्रश्नावर सकाळ मध्ये लिहीलेला हा लेख

26th May 2022