आज दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती मोठया उत्साहात साजरा करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. प्रा. एडके सर, डॉ. संदीप अनपट यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकला. तसेच डॉ. शेख सर, डॉ. अश्विनी पारखी, डॉ. शिल्पा काब्रा, प्रा. अमोल चौधरी, प्रा. प्रमोद सपकाळ, प्रा. रेणुका तलवार इत्यादी कार्यक्रमास उपस्थित होते. महाविद्यालयातील 35 विदयार्थी याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण कड यांनी केले.