Friday, December 5, 2025

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती (०५/०९/२०२५) निमित्त आयोजित कार्यक्रम

 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती (०५/०९/२०२५) निमित्त आयोजित कार्यक्रम :


भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयामध्ये अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश पटारे यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करत कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या प्रसंगी डॉ. सुशील गंगणे सरांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या शिक्षणक्षेत्रातील अमूल्य योगदानाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.











कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पूनम शिंदे यांनी प्रभावीपणे पार पाडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश पटारे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून प्रोत्साहन दिले, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.

Note: Only a member of this blog may post a comment.