Wednesday, February 28, 2024

MMCC got talent

 प्रत्येक शैक्षणिक वर्षात किमान एकदातरी शिक्षकांना आनंद मिळावा या उद्देशाने बी. बी. ए. विभाग वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत असते. सतत गेली तीन वर्षे आपण अश्या कार्यक्रमांचा आनंद घेत आहोत. याही वर्षी याच धर्तीवर एक वेगळा कार्यक्रम घेण्यात आला ज्यात सर्व शिक्षकांनी भरभरून सहभाग नोंदवला व विविध कलागुणांचे सादरीकरण केले. आपल्यामध्ये असणाऱ्या विविध कला सादर करण्याची संधी सर्वांना मिळावी व कामाच्या व्यापातून थोडासा विसावा मिळावा हा या कार्यक्रमाचा उद्देश्य होता. नक्कीच तो उद्देश्य साध्य झाला याची पोच पावती सर्व उपस्थितांना कार्यक्रमादरम्यानच मिळाली. विशेष म्हणजे वर्षातून एकदा होणारा हा कार्यक्रम महिन्यातून एकदा व्हावा असा आग्रह ही बऱ्याच शिक्षकांनी केला. कार्यक्रम शिक्षकांचा असल्या कारणाने त्यात 'Teacher's Forum' चा ही सहभाग व्हावा ही इच्छा होती. Teacher's forum coordinator प्रा.स्वप्नील कांबळे यांचे आम्हा सर्वांना सहकार्य लाभले. 

कार्यक्रमाची शोभा वाढली ती माननीय प्राचार्यांचा उपस्थिती मुळे. सरांची सर्वांना पूर्णवेळ साथ लाभली यामुळे सर्वांचाच आनंद नक्कीच द्विगुणित झाला. प्राचार्यांच्या परफॉर्मन्स ने सर्वांचे लक्ष वेधले, अत्यंत सुंदर सादरीकरण सर्व सहभागी शिक्षकांनी केले. इतकेच नव्हे तर बऱ्याच शिक्षकांनी शेवटच्या क्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला व कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.




No comments:

Post a Comment

This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.

Note: Only a member of this blog may post a comment.