अमेय प्रकाशनाच्या वतीने प्रख्यात रेडिओलॉजिस्ट डॉ. अरुण किनरे लिखित आणि संतोष शेणई अनुवाद केलेल्या `रेडीअन्ट डेस्टिनी` या आत्मकहाणीचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते आज (रविवारी) झाले. यावेळी (डावीकडून) संतोष शेणई, डॉ. मोहन आगाशे, डॉ. जब्बार पटेल, सतीश आळेकर, डॉ. किनरे व उल्हास लाटकर उपस्थित होते. अमेय प्रकाशन निर्मित हे संतोष शेणाइंचे दुसरे अनुवादित पुस्तक.
ही आत्मकहाणी एका डॉक्टर-पेशंटची आहे. पंचवीस वर्षांपूर्वी डॉ. किनरे यांना हार्टअटॅक आला. तेथून आजारांची मालिकाच सुरू झाली. आजवर दोन ओपन हार्ट सर्जरी, १४ एन्जिओग्राफी, पाच अन्जिओप्लास्टी, दोन पेसमेकर शस्त्रक्रिया, कर्करोग, कोलोस्टॉमी, कोलोस्टॉमी बंद करण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया, हृदयात बुरशीजन्य संसर्ग, त्यासाठी लेझर शस्त्रक्रिया, अर्धांगवायूचा झटका, सिंकोपीचे अनेक अटॅक, डेंग्यू, त्वचारोग, किलॉइडसचा त्रास, आणखीही बरंच काही. एका आयुष्यात. वयाच्या पन्नाशीनंतर. तरीही हा माणूस हसतमुख असतो. त्यांच्यातील जिद्द व धाडस अनेकवेळा दिसून आलं. ते अजून क्लिनिकला नियमित जातात. देशापरदेशात कॉन्फरन्समध्ये सहभागी होतात. शोधनिबंध सादर करतात. अशी ही अचाट आणि अफाट कहाणी संतोष शेणाइंना अनुवाद करता आली.
No comments:
Post a Comment
This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.
Note: Only a member of this blog may post a comment.