Sunday, September 17, 2023

Tree plantation on 14th August 2023

 मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स निवडणूक साक्षरता मंडळातर्फे( Electoral Literacy Club) आज दि 14 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता निवडणूक आयोग पुणे जिल्हाधिकारी कार्यालय,निवडणूक साक्षरता मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना आणि We Foundation यांच्यावतीने प्रतीकात्मक वृक्षारोपणाचा कार्यक्रम वनदेवी टेकडी, कर्वेनगर येथे मोठया उत्साहात राबविण्यात आला. यामध्ये अनेक महाविद्यालय व क्लब सहभागी झाले होते.मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्समधील निवडणूक साक्षरता मंडळा अंतर्गत (Electoral Literacy Club)एकूण 35 विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि वृक्षारोपण केले. या प्रसंगी निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. श्रीकांत देशपांडे व इतर प्रतिनिधी तसेच We Foundation चे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांसोबत वृक्षारोपण आणि पर्यावरण बाबत संवाद साधला आणि सहभागाबाबत विद्यार्थ्यांचे आणि महाविद्यालयाचे कौतुक केले. महाविद्यालय स्तरावर कार्यक्रम यशस्वी होण्यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार, प्रा. सारंग एडके यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालय नोडल अधिकारी म्हणून डॉ. पूनम शिंदे आणि कॅम्पस अँबेसिडर म्हणून सौरव ढमाले यांनी काम पाहिले.










No comments:

Post a Comment

This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.

Note: Only a member of this blog may post a comment.