मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयात निर्भय कन्या अभियानाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, डेक्कन पुणे यांच्यावतीने विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी निर्भय कन्या अभियानाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत मॅडम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. स्वतःमध्ये आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सहनशीलता, क्रियाशीलता, आणि महत्त्वकांक्षा या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास यशाचे शिखर नक्कीच गाठता येईल, असा विश्वास त्यांनी विद्यार्थिनींमध्ये रुजविला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार यांनी भूषवले. तसेच याप्रसंगी पीस फाउंडेशनच्या संस्थापक आम्रपाली चव्हाण आणि अर्चना सावंत यांनी व्यक्तिमत्व विकासाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. तन्वी कुऱ्हाडे यांनी महिलांचे आरोग्य या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण कड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. स्नेहल बोरकर यांनी केले. या प्रसंगी प्रा. स्वप्निल कांबळे, प्रा. सुशील गंगणे प्रा.पुनम शिंदे, प्रा.मिनल काब्रा, डॉ. अश्विनी कुलकर्णी, प्रा. स्मिता कोप्पल,डॉ. कल्पना वैद्य, प्रा. ऋतवी रावळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विभाग प्रमुखांचे सहाय्य लाभले.
The second day of "Nirbhay Kanya Abhiyan" program.
Our first guest Advt. Rani Sonawane and Advt. Deepali Sonawane delivered the lecture on "Women's Rights".
Second guest Dr. Nisha Kemase has delivered her thoughts on "Health and Nutrition".
The program concluded with "Self Defense Workshop" conducted by Kishor Shinde and his students. Where our all girl students learnt many karate techniques to defend their self.
Some glimpses of yesterdays session attaching herewith.
No comments:
Post a Comment
This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.
Note: Only a member of this blog may post a comment.