शिवस्वराज्य दिन महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा:* मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना तसेच विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने आज दिनांक 6 जून 2022 हा शिवराज्याभिषेक दिन/शिवस्वराज्य दिन म्हणून महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शिववंदना सादर केली. डॉ. संदीप अनपट, डॉ. अश्विनी कुलकर्णी तसेच विद्यार्थ्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण कड यांनी केले तर आभार प्रा. सुशील गंगणे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.