Wednesday, May 18, 2022

Maitreya : Temple of Unity

 

*मैत्रेय : एक आपुलकीची जाणिव.*
एक छोटस घर, त्या घरामध्ये आपापल्या प्रश्नांमागे, आपापल्या भविष्याच्या शोधात हरवलेली असंख्य माणसे जसे दिवसभर आपापल्या कामात मग्न असुन सुद्धा संध्याकाळी जेवतना मात्र सगळे एकत्र येतात, तशी काहीशी अनुभूती आजच्या एम.एम. सी.सी. महाविद्यालयाच्या वार्षिक 'वॉक ऑफ युनिटी' ह्या कार्यक्रमामधुन आली. जिथे एकाच कॉलेज मधले वेगवेगळे विभाग वा त्या विभागमध्ये शिकणारी अनेक मुले आपल्या दैनंदिन आयुष्यातुन वेळ काढून जवळजवळ तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा एकदा कॉलेजच्या परिसरात भारताच्या प्रत्येक राज्याचा, त्याच्‍या परंपरेचा, त्‍याच्‍या वेगळेपणाचा आणि ह्या सर्व वैविध्‍यातुन सुद्धा त्यांच्यात असणारया एक समान भारतीयत्वाच्या भावनांचे प्रतीक बनताना दिसले.
आजच्‍या ह्‍या अतिशय गोंधळलेल्‍या आणी लोककल्‍याणाऐवजी एकमेकांवर टिका करण्यात, एकमेकांना तुच्‍छता दाखवण्‍यात हरवलेली राजकीय व्‍यवस्‍था, कोरोना महामारीमुळे वाढलेली महागाई, बेरोजगारी, प्रत्येक वर्षामागे वाढत जाणारी वित्तीय तुट अशातच देशातील सामाजिक स्वास्थ बिघडवनारया हरकती आणि असे कैक प्रश्न बघितल्यावर कुठल्याही आशावादी माणसाला सुद्धा कदाचित भारताच्या भविष्याची त्याच्या अस्मितेची आणि त्याच्या अखंडतेची चिंता वाटल्यावाचून राहणार नाही. आणी अशा ह्या गोंधळलेल्या परिस्थीतीत एम.एम.सी.सी.कॉलेजचा हा वार्षीक कार्यक्रम खरच आजही त्या भारतीयत्वाच्या अस्मितेची आणि त्याच्या अखंडत्वाची जाणीव करुन देण्यास समर्पक ठरला असेच म्हणावे लागेल.
जशी शाळा सुटली आणि भारताची प्रतिज्ञा म्हणायची सवय तुटली तेव्‍हापासून आपण भारतीय आहोत ही गोष्‍ट फक्‍त आपल्‍याला कदाचित 15 ऑगस्‍ट आणी 26 जानेवारी सोडून कधी कुणाला लक्षात तरी असेल की नाही  असा प्रश्न पडतो. इथं प्रत्येक जण कुठल्यातरी प्रांतामध्ये कुथल्यातरी भाषेमध्ये, कुथल्यातरी धर्मामध्ये, जातिमध्ये विभागलेला दिसतो. आणी म्हणुनच कधीतरी ह्या अशा वातावरणात कॉलेज स्तरावर झालेला 'Walk of Unity' हा कार्यक्रम खरोखरच कौतुकास पात्र ठरतो. जिथे मुलांच्‍या मनोरंजनाखेरीज मुलांमध्ये अस्‍ाणारी भारतीयत्‍वाची संवेदनशीलता ह्‍या आशा कार्यक्रमांमुळे जोपासण्‍यास व ती अधिक सुद्रूढ करण्यास मदत होते.
असा हा कार्यक्रम करावा असा विचार करणारया महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीचे, तो कार्यक्रम उत्कृष्ठ पदधतीने पार पाडणारया व्‍यवस्‍थापकीय विभागाचे, कॉलेजच्‍या मानणीय प्राचार्यांचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पुन्हा एकदा भारतीयत्वाची जाणीव करुण देणारया, पुन्हा एकदा भारतीय असण्यावर गर्व करावासा वाटुन देनारया त्या सर्व मुलांचे ज्यांनी ह्या कार्यक्रमात मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने सहभाग नोंदवला त्या सर्वांचे मनापासुन अभिनंदन.
आणी म्हणुनच हा कार्यक्रम पहिल्यावर जाफ़र मलीहाबादी यांचा शेर आठवल्या शिवाय राहत नाही.

*🇮🇳वतन के जाँ-निसार हैं वतन के काम आएँगे*
*हम इस ज़मीं को एक रोज़ आसमाँ बनाएँगे.🇮🇳*

No comments:

Post a Comment

This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.

Note: Only a member of this blog may post a comment.