मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पुरस्कार समारंभ आज मोठ्या दिमाखात पार पडला.
आज रविवार, दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य,
पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. मंगेश कोळपकर, आणि श्री छत्रपती पुरस्कार विजेते श्री. जयंत गोखले या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार, मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष मा. श्री. भाऊसाहेब जाधव आणि महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख श्री. गायकवाड सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या ओघवत्या वाणीतून प्रा. सुजाता शेणई यांनी केले.
गुणवंत खेळाडू, गुणवंत विद्यार्थी, आणि विशेष कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा या ठिकाणी पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.
"आपल्या आयुष्यात उत्तम व्यायाम, कला आणि अभ्यास असेल तर आपण कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश संपादन करू शकतो" असे उद्गार यावेळेस डॉ. माधवी वैद्य यांनी काढले.
कार्यक्रमाचे उत्तम नियोजन, आयोजन आणि व्यवस्था याची मान्यवरांनी जाहीर दखल घेत आयोजकांमध्ये स्फूर्तीचे वातावरण मात्र निर्माण केले.
पसायदानाने कार्यक्राची सांगता झाली. कार्यक्रम मोठ्या दिमाखात यशस्वीपणे पार पडला.
प्रा. बर्वे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.
आज चा सकाळ Today मध्ये सायली गोरड ची बातमी, जीचा सत्कार आपण Annual Prize Distribution मध्ये केला. सायली बीकॉम ची २०१७_१८ बॅच ची विद्यार्थिनी आहे.