1 डिसेंबर 2021 रोजी महाविद्यालयात 'जागतिक एड्स निर्मूलन व जनजागृती दिन' साजरा*
दिनांक
1 डिसेंबर 2021 रोजी मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय
राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने
महाविद्यालयात 'विषमता निर्मूलन. एड्स निर्मूलन' ("END INEQUALITIES , END
AIDS") या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर स्पर्धा
ही ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने घेण्यात आली. या स्पर्धेत
महाविद्यालयातील 40 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. स्पर्धेचे आयोजन
दि. 1 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10:30 ते 12:00 या वेळेत करण्यात आले होते.
या
स्पर्धेसाठीचे नियोजन महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी
प्रा. प्रवीण कड तसेच विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. अमोल चौधरी
यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी संचालनासाठी प्रा. सुशील गंगणे, डॉ.
शिल्पा काबरा, डॉ. अश्विनी पारखी प्रा.प्रमोद सपकाळ यांचे सहकार्य लाभले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार यांनी विद्यार्थ्यांनी
स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment
This is a student and faculty forum of MMCC. Comments are welcome for positive criticism and individual opinion.
Note: Only a member of this blog may post a comment.