Saturday, October 30, 2021

Diwali Card & Diya Making

Deapartment of commerce had organised *Greeting Card making and Diya decoration** competition on 29/10/2021. Few glimpses of the same.



Friday, October 29, 2021

‘एबीपी माझा’च्या पहिल्या दिवाळी अंक

 

 


 ‘एबीपी माझा’च्या पहिल्या दिवाळी अंकाच्या , ‘माझा’च्या संपादनाची संधी for Mr. Santosh Shenai 

 

पूरग्रस्त आपत्कालीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम

 

मराठवाडा मित्र मंडळ, डेक्कन जिमखाना. पुणे या संस्थेने माजी विद्यार्थी मंडळ, विद्यार्थी सहाय्यक समिती, पुणे यांच्या मदतीने पूरग्रस्त आपत्कालीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम दिनांक. 24 ऑक्टोंबर 2021 रोजी पार पडला.
22 जुलै 2021 च्या महापुराने पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक हानी झाली असून तेथे खूप नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर येथील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. 












१) रायगड जिल्हा परिषद शाळा, उमरठ ता. पोलादपूर जि रायगड येथील  पहिली ते सातवी पर्यंत च्या 199 विद्यार्थ्यांना दप्तर देण्यात आले.  त्यामध्ये वह्या, कंपास, स्केचपेन, पेन, रंगपेटी अशा वस्तू देण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावरील समाधान आणि त्यांची उत्सुकता पाहून आनंद वाटला. यावेळी तेथील शिक्षक प्रतिनिधी कळंबे सर आणि इतर सहकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

२) माध्यमिक विद्यालय साखर  ता पोलादपूर जि रायगड येथील पाचवी ते दहावी पर्यंत च्या 110 विद्यार्थ्यांना दप्तर देण्यात आले .त्यामध्ये वह्या, कंपास, स्केचपेन, पेन, रंगपेटी अशा वस्तू देण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावरील समाधान आणि त्यांची उत्सुकता पाहून आनंद वाटला. यावेळी तेथील शिक्षक प्रतिनिधी /मुख्याध्यापक श्री.विजय दरेकर सर आणि इतर सहकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

3) कांगोरीगड माध्यमिक विद्यालय मोरसडे ता.पोलादपूर जि.रायगड येथील पाचवी ते दहावी पर्यंतच्या 133  विद्यार्थ्यांना दप्तर देण्यात आले.
यामध्ये वह्या, कंपास, स्केचपेन, पेन, रंगपेटी अशा वस्तू देण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावरील समाधान आणि त्यांची उत्सुकता पाहून आनंद वाटला. यावेळी तेथील शिक्षक प्रतिनिधी /मुख्याध्यापक श्री. केशव उत्तेकर सर आणि इतर सहकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

4) रायगड जिल्हा परिषद केंद्र बोरघर ता. पोलादपूर जि.रायगड येथील पहिली ते नववी पर्यंतच्या 92 विद्यार्थ्यांना दप्तर देण्यात आले.यामध्ये वह्या, कंपास, स्केचपेन, पेन, रंगपेटी अशा वस्तू देण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावरील समाधान आणि त्यांची उत्सुकता पाहून आनंद वाटला. 
कार्यक्रमाचे आयोजन तेथील जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री चंद्रकांत कळंबे सर, केंद्र प्रमुख मदने सर,  अरुण जाधव यांनी केले.
तसेच मराठवाडा मित्र मंडळ, पुणे आणि माजी विद्यार्थी मंडळ, विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे चे पदाधिकारी उपस्थित होते.


1) श्री.रमेश पंडित सर
(उप-प्राचार्य - मराठवाडा मित्र मंडळाचे व्यावसायिक विभाग, पुणे)

2) गणेश काळे सर
 ( खजिनदार, माजी विद्यार्थी मंडळ, विद्यार्थी सहाय्यक समिती, पुणे)

3) श्री.लक्ष्मण जाधव सर
(प्राध्यापक, मराठवाडा मित्र मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे)

4) श्री.गजेंद्र धमाल सर
( प्राध्यापक, मराठवाडा मित्र मंडळाचे विधी महाविद्यालय, पुणे)

5) श्री. संतोष कौलगे
( कार्यालयीन अधिक्षक, मराठवाडा मित्र मंडळाचे तंत्रनिकेतन, काळेवाडी पुणे)

6) गणेश ननवरे
 (वसतिगृह पर्यवेक्षक, मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालय, पुणे)

7) धीरज रोकडे
(विद्यार्थी, मराठवाडा मित्र मंडळाचे व्यावसायिक विभाग, पुणे)

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - श्री. सुभाष ढाने सर यांनी केले तर आभार श्री. संतोष सुतार सर यांनी मानले.