*राष्ट्रीय सेवा योजना दिन MMCC महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा*:
आज दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिन महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या सहयोगाने महाविद्यालयात विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयातील 58 जणांनी रक्तदान केले. तसेच विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून 'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान' असा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविला आणि रक्तदानासाठी आवाहन केले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्यकारिणी सदस्य मा. प्रा. तेज निवळीकर सर उपस्थित होते. तसेच ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वतीने सामाजिक अधीक्षक डॉ. अरुण बर्डे तसेच रक्त संक्रमण अधिकारी डॉ. प्रगती सिंग यादेखील उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार , वाणिज्य विभागप्रमुख एस. एम. एडके यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिर यशस्वीपणे पार पडले. मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष मा.श्री. भाऊसाहेब जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रा. निवळीकर सर यांनी व्यक्तिमत्व विकासात राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील 176 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.