Wednesday, August 17, 2022

Har Ghar Tiranga

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सूचित करण्यात येते की, ‘हर घर तिरंगा' या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा भाग म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात युवासंकल्प अभियानाचा प्रारंभ मा. उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते ९ ऑगस्ट २०२२ रोजी झाला. गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये राष्ट्रध्वजासोबतच्या १,५०,००० पेक्षा अधिक फोटोंची विश्वविक्रमाची नोंद होणार आहे.


आपल्या मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने आपणही या अभियानात सहभागी व्हा आणि आपला राष्ट्रध्वजासोबत फोटो https://spputiranga.in/photoupload/ या लिंक वर १४ ऑगस्ट मध्यरात्रीपर्यंत अपलोड करा !

राष्ट्रध्वजासोबत फोटो काढण्याचा दिनांक आणि वेळ: शनिवार, दि. 13 ऑगस्ट, 2022
*दुपारी ठीक 3: 15 वाजता
ठिकाण: हॉल क्र. 102.*

चला तर विश्वविक्रम घडवूया, इतिहास रचूया !





Thursday, August 11, 2022

Rakshabandhan celebration at Deccan Police Station

 


NSS and SDC celebrates रक्षाबंधन at Deccan Police Station on 11th August 2022. Not only the Police Officers but the visitors also overwhelmed to see such a wonderful celebration. 




Participation in 'Har Ghar Tiranga' organized by SPPU on 9th August 2022


 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत युवा संकल्प अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आज दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमात आपल्या मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण कड या प्रसंगी उपस्थित होते.

हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत तिरंग्यासोबत आपला स्वतःचा फोटो काढून तो विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करून गिनीज बुक रेकॉर्ड करण्याचे अभियान देखील सुरू करण्यात आले. महाविद्यालय स्तरावर आपण सुद्धा या अभियानाचा भाग होऊयात.

Article on NEP by Prof. Swapnil Kamble

 


Farewell for Third Year Students

 Computer Department on 18th June 2022