Wednesday, March 12, 2025

फळे, फुले व भाजीपाला स्पर्धा २०२५

 माझ्या सहकारी डाॅ. नुतन कुलकर्णी याना पुणे महानगरपालिकेच्या फळे, फुले व भाजीपाला स्पर्धा २०२५ मध्ये "पुष्परचना" विभागात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. अभिनंदन 🌷





Guest lectures under Nirbhay Kanya Abhiyan

 We are pleased to share that the guest lectures on

 1. Women's Health - Dr. Tanvi Kurhade and
2. Cyber Crime & Security - Miss Uma Palave (Constable) 
were successfully conducted under *Nirbhay Kanya Abhiyan.* The sessions were highly informative and beneficial for our students.









Pune International Film Festival

 Students of Journalism and Mass Communication department working in media team at Pune International Film Festival

# Day 1 with famous actor and writer  Kishor Kadam(सौमित्र ) 






माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन

 आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स राष्ट्रीय सेवा योजना आणि निवडणूक साक्षरता मंडळ , वर्शिप अर्थ फाउंडेशन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे महानगरपालिका पूनावाला फाउंडेशन आणि इतर संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने भिडे पूल, मुठा नदी जवळ माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन  स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला.**यावेळी अशा उपक्रमामध्ये सक्रिय सहभागी असल्याकारणाने आपल्या  महाविद्यालयाला प्रशंसा पुरस्कार ( Appreciation Award) देऊन सन्मानित करण्यात आले.*

 यामध्ये मोठ्या प्रमाणात शाळा महाविद्यालय, एनजीओ सहभागी झाले होते, आपल्या महाविद्यालयातील 50 विद्यार्थी  सहभागी होऊन त्यांनी नदीकाठी स्वच्छता केली त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सक्रिय स्वयंसेवक म्हणून आपल्या महाविद्यालयातील दहा विद्यार्थी  सहभागी झाले होते तसेच आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रांजल खर्चे हिने पर्यावरण बाबत सुंदर कविता सादर केली,

यावेळी माजी केंद्रीय मंत्री राजकुमार सिंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, अभिनेते प्रविण तरडे, प्रशासकीय अधिकारी आशा राऊत, निखील देशमुख, आशिष शेटे, अनिल सातव, नितीन देशपांडे, वर्शिप अर्थ फाउंडेशनचे संस्थापक पराग मते, सह संस्थापक राज देशमुख,  यांसह विविध धर्मांचे धर्मगुरु देखील उपस्थित होते.मुळा-मुठा सह्याद्रीच्या लेकी...वुई लव्ह मुळा-मुठा नदी...ध्यास स्वच्छतेचा, ध्यास प्रगतीचा...नद्या वाचवा, जीवन वाचवा...असे फलक हातात घेत घोषणांसह महाविद्यालयीन युवक-युवती, शालेय विद्यार्थी आणि पुणेकरांनी मुठा परिसर स्वच्छतेने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. एक हजारहून अधिक पुणेकरांनी मुठा नदी पात्रात एकत्र येत माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन उपक्रमात सहभाग घेत मुठा नदी विषयी प्रेम व कृतज्ञता व्यक्त केली.

मुळा-मुठा नदी स्वच्छतेविषयी यावेळी उपस्थितांनी शपथ घेतली. यामध्ये जपान, ब्राझील, रशिया, श्रीलंका या देशातील पर्यावरणप्रेमींनी देखील सहभाग घेतला. पर्यावरण रक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल नीलय उपाध्याय यांना यावेळी मुळा-मुठा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 


या कार्यक्रमाचे महाविद्यालयाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजन कार्यक्रम अधिकारी प्रा दशरथ गावित तसेच  डॉ. कल्पना वैद्य, आणि निवडणूक साक्षरता मंडळ समन्वयक डॉ पूनम शिंदे यांनी केले.

या कार्यक्रमाला आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेश पठारे सर ,विभाग प्रमुख, सर्व शिक्षक यांचे सहकार्य लाभले त्याबद्दल आभार🙏🏻🙏🏻





 














Trade Fair

 The Department of Commerce had organized Trade Fair on 14.02.2025.

The objective was to provide a platform for students to showcase their entrepreneurial and marketing skills, as well as to promote digital payments.

Students from all departments participated, setting up stalls with food delicacies, entertaining games, and merchandise. 
A total of 15 groups and 112 students took part in the event. The fair received an overwhelming response from students, teaching staff, and non-teaching staff.
Faculties from our sister institutes also visited and appreciated the event.