*एम एम सी सी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत उद्या दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम* :
उद्या दि. 2 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त "स्वच्छ अमृत महोत्सव" राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये इंडियन स्वच्छता लीग, पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त कार्यालय तसेच MMCC NSS यांचा सहभाग असणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता एस एम जोशी ब्रीज जवळ होणार आहे.
तसेच सकाळी 9:30 वाजता पुणे रेल्वे स्टेशन, महात्मा गांधी स्मारकाजवळ महाविद्यालयातील विद्यार्थी पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत पथनाट्य सादर करणार आहेत.
*राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त MMCC NSS चा "स्वच्छ अमृत महोत्सवात" उस्फूर्त सहभाग:* आज दि. 2 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त "स्वच्छ अमृत महोत्सव" मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये इंडियन स्वच्छता लीग, पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त कार्यालय, नेहरू युवा केंद्र तसेच MMCC NSS यांनी सक्रियपणे सहभाग घेतला.
या उपक्रमाचे उद्घाटन आज सकाळी 7:30 वाजता एस एम जोशी ब्रीज जवळ करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी नदीपात्रात प्लास्टिक मुक्त अभियान राबविले तसेच कचरा संकलन व व्यवस्थापनात पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना मदत केली.
तसेच सकाळी 9:30 वाजता पुणे रेल्वे स्टेशन, महात्मा गांधी स्मारकाजवळ विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास अभिवादन करून स्वच्छतेची प्रतिज्ञा केली. तसेच विद्यार्थ्यांनी लाल बहादूर शास्त्री यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाविषयी पथनाट्याच्या माध्यमातून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी पुणे मनपाचे आयुक्त मा. विक्रम कुमार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. महाविद्यालयातील 46 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाली होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम पार पडला.प्रा. प्रवीण कड आणि डॉ. कल्पना वैद्य यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.