Tuesday, September 13, 2022

Poster Competition to celebrate Azadi Ka Amrit Mahotsav

On 5th September 2022, Department of Computer Science conducted Poster making Competition  under Azadi Ka Amrit Mahotsav on the theme of :

1)  Friends in space
2) Dream World
3) Pride of India




The objective of this competition was to encourage Indian Knowledge System and Critical Thinking, 










Following groups are winners: 


Rank -1   Group B-19
1)Sanika sawant
2)Rutuja More
3)Shravani Devakar
4)Rutuja Ganorkar

Rank-2  Group A-6
1) Ketaki Ghatake
2) Srushti Kodre
3) Sanika Shinde


Rank-3. Group A-9
1)Sohan Kendre
2)Abhay Abhilash
3)Atharva Mahadik

             and

Rank -3 Group B-14
1) Srutika Lokhande
2)Bharti Dhoble
3)Dhanashri Nale
4) Sakshi Dev 

Wednesday, September 7, 2022

Nirmalya Collection for Eco Friendly Ganeshotsav 2022

 *गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य संकलन जनजागृती उपक्रमात आपल्या MMCC NSS च्या स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग:*

आज दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी आपल्या मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य संकलन जनजागृती उपक्रमात सक्रियपणे सहभाग नोंदविला. यामध्ये एकुण 55 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. सदर उपक्रम पुणे महानगरपालिका, जनवाणी संस्था, कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

हा उपक्रम आज दिनांक 5 सप्टेंबर 2022 आणि 9 सप्टेंबर 2022 अशा दोन दिवशी सकाळी 11:00 ते रात्री 9:00 या  अवधीत राबविण्यात येत आहे. यामधे झेड ब्रीज,पतांगा घाट, पांचलेश्वर मंदिर, एस. एम. जोशी पुल, गोगटे शाळा इत्यादी नेमून दिलेल्या विसर्जन घाटावर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कार्यरत आहेत. निर्माल्य व्यवस्थापनावर जनजागृतीचे काम विद्यार्थी करत आहेत... 

Wednesday, August 17, 2022

Har Ghar Tiranga

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सूचित करण्यात येते की, ‘हर घर तिरंगा' या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा भाग म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात युवासंकल्प अभियानाचा प्रारंभ मा. उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते ९ ऑगस्ट २०२२ रोजी झाला. गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये राष्ट्रध्वजासोबतच्या १,५०,००० पेक्षा अधिक फोटोंची विश्वविक्रमाची नोंद होणार आहे.


आपल्या मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने आपणही या अभियानात सहभागी व्हा आणि आपला राष्ट्रध्वजासोबत फोटो https://spputiranga.in/photoupload/ या लिंक वर १४ ऑगस्ट मध्यरात्रीपर्यंत अपलोड करा !

राष्ट्रध्वजासोबत फोटो काढण्याचा दिनांक आणि वेळ: शनिवार, दि. 13 ऑगस्ट, 2022
*दुपारी ठीक 3: 15 वाजता
ठिकाण: हॉल क्र. 102.*

चला तर विश्वविक्रम घडवूया, इतिहास रचूया !





Thursday, August 11, 2022

Rakshabandhan celebration at Deccan Police Station

 


NSS and SDC celebrates रक्षाबंधन at Deccan Police Station on 11th August 2022. Not only the Police Officers but the visitors also overwhelmed to see such a wonderful celebration. 




Participation in 'Har Ghar Tiranga' organized by SPPU on 9th August 2022


 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत युवा संकल्प अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आज दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमात आपल्या मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण कड या प्रसंगी उपस्थित होते.

हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत तिरंग्यासोबत आपला स्वतःचा फोटो काढून तो विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करून गिनीज बुक रेकॉर्ड करण्याचे अभियान देखील सुरू करण्यात आले. महाविद्यालय स्तरावर आपण सुद्धा या अभियानाचा भाग होऊयात.