Friday, 4th March 2022 at 11 AM in Dnyaneshwar Hall
आज आपल्या महाविद्यालयात एक अनोखा कार्यक्रम पार पडला. `एम्प्लॉयी ऍप्रिसिएशन प्रोग्राम ` म्हणजेच कर्मचारी प्रशंसा कार्यक्रम!
`IQAC` आणि `टीचर्स फोरम` यांनी एकत्रितपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार यांनी प्राध्यापकांना प्रशंसापत्र (letter of appreciation) व एक भेटवस्तू देऊन गौरविले आणि आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी प्रा. गायकवाड, प्रा. शेख, प्रा. पारखी व इतर प्राध्यापकांनी आपले अनुभव आणि संस्थेप्रती प्रेम व आदर व्यक्त केला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. सारंग एडके यांनी सर्वाना मोलाचे मार्गदर्शन केले आणि आपल्या महाविद्यालयाच्या वाटचालीवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनपट यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रा. सुशील सरांनी केले.
हा अतिशय अनोखा कार्यक्रम असून आपल्या कामाची दखल व प्रशंसा हे अतिशय प्रेरणादायी आहे असे उद्गार बहुतेक प्राध्यापकांनी यावेळी काढले.