दिनांक 31 डिसेंबर 2021 रोजी आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, पुणे शहर पोलीस, पुणे शहर वाहतूक नियंत्रण कक्ष, कात्रज डेअरी आणि आपल्या मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे एकक यांच्या संयुक्त विद्यमाने 'दारू नको, दूध प्या-मानवतेचा बोध घ्या' या जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रम गुडलक चौक येथे दुपारी 04 ते 6:00 या वेळेत आयोजित करण्यात आलेला आहे. महाविद्यालयाचे निवडक 40 विद्यार्थी या उपक्रमात सक्रियपणे सहभागी होणार आहेत. पथनाट्य, रॅली, मानवी साखळी, जनजागृतीपर विविध घोषणा इत्यादी माध्यमातून सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा हा एक अनोखा उपक्रम आहे...